Thu, Nov 15, 2018 20:12होमपेज › Marathwada › ‘आप्पा तुमच्यासारखाच जनसामान्यांसाठी संघर्ष करेन’

‘आप्पा, तुमच्यासारखाच जनसामान्यांसाठी संघर्ष करेन’

Published On: Jun 03 2018 2:28PM | Last Updated: Jun 03 2018 2:27PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

आदरणीय आप्पा, आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी संघर्ष'  या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन !" अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली. 

धनंजय मुंडे यांनी सकाळी जगमित्र कार्यालयात जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या  प्रतिमेचे पूजन केले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी "लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 'जनसामान्यांसाठी संघर्ष' करण्याची दिलेली शिकवण सदैव अनुसरेन" अशा भावना ट्विटरवरुन  व्यक्त केल्या आहेत.