Wed, Mar 27, 2019 02:12होमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंकडून भागवतांची खिल्‍ली (Video)

धनंजय मुंडेंकडून भागवतांची खिल्‍ली (Video)

Published On: Feb 15 2018 4:16PM | Last Updated: Feb 15 2018 4:16PMश्रीगोंदा : पुढारी ऑनलाईन

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या सैनिकांविषयीच्या वक्‍तव्यावरून राष्‍ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाने निषेध व्यक्‍त केला. या विधानावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भागवतांची व राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची खिल्‍ली उडवली. हल्‍लाबोल यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंडे श्रीगोंद्यात बोलत होते. 

मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याला तयार होण्यास ६ महिने लागत असतील तर देशासाठी संघाचे स्‍वयंसेवक ३ दिवसांत तयार होतील, असे विधान करून वाद ओढवून घेतला. या विधानावरून वाद वाढू लागल्यानंतर राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाकडून याप्रकरणी स्‍पष्‍टीकरणही देण्यात आले होते. 

राष्‍ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ व मोहन भागवत यांच्याविरोधात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढले. धनंजय मुंडे यांनी भागवत यांच्या या वक्‍तव्याचा निषेध करताना संघ स्‍वयंसेवकांची मार्मिक भाषेत खिल्‍ली उडवली. 'पाककडून गोळ्या आल्या तरी हे मारीन मारीन म्‍हणून भीती घालतील,' असे मुंडे म्‍हणाले.