Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Marathwada › वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा प्रयत्न : धनंजय मुंडे

वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा प्रयत्न : धनंजय मुंडे

Published On: Dec 11 2017 7:56PM | Last Updated: Dec 11 2017 7:56PM

बुकमार्क करा

परळी : प्रतिनिधी

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटने प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे असते तर, घटनेच्या दिवशीच संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती. कारवाई झाल्याशिवाय गेट समोरून उठलो ही नसतो. मात्र, घटनास्थळी आम्हाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनातच ही घटना दडपण्याचा डाव आहे की काय? असा संशय आता निर्माण होत असल्याचा आरोप, विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

परळीच्या वैद्यनाथ कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाचा हौद फुटुन पाच कर्मचाऱ्यांचा मृत्‍यू  झाला आणि इतर सात कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी तीन मृत्युशी झुंज देत आहेत. 

धनंजय मुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘ऐवढी मोठी घटना घडून चार दिवस उलटल्यानंतरही साधा गुन्हाही दाखल होत नाही. राजकारण करायचे असते तर, आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती. मात्र, तशी मागणी केली नाही तर या घटनेस जे खरोखरच जबाबदार  आहेत त्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशीच आमची मागणी आहे.  या घटनेतील मृत्यूस जबाबदार असणाऱ्यां विरूध्द कारवाई होत नाही तो पर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.’’