Sat, Sep 22, 2018 20:45होमपेज › Marathwada › गाव तिथे विकास दौर्‍याला तपोवनमधून प्रारंभ

गाव तिथे विकास दौर्‍याला तपोवनमधून प्रारंभ

Published On: Jan 25 2018 12:44PM | Last Updated: Jan 25 2018 12:44PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या  'गाव तिथे विकास दौर्‍याला' आजपासून तपोवन येथील महादेवाचे दर्शन घेऊन  प्रारंभ  झाला. या दौर्‍याच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मूलभूत विकास योजनेच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात आले.  

या कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे यांचे जोरदार स्‍वागत करण्यात आले. यावेळी तपोवनमध्ये झालेल्या विकास कामांचे भूमीपूजन करून त्यांच्या हस्‍ते काही कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. 
कार्यक्रमप्रसंगी पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघात विविध माध्यमांतून कोट्यवधींचा निधी विकासासाठी आला.  'गाव तिथे विकास दौर्‍याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा व नागरिकांच्या समस्या  जाणून घेतल्या. गाव तिथे विकास दौरा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, तांडा व वस्तीवर टप्प्याटप्प्याने  जाणार आहे. या दौर्‍यात भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.