Thu, Apr 25, 2019 21:45होमपेज › Marathwada › भाजप सरकार लोकशाहीला मारक : अजित पवार 

भाजप सरकार लोकशाहीला मारक : अजित पवार 

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 10:53PMसेलू : प्रतिनिधी

भाजप हे सरकार समाजातल्या कोणत्याच घटकाला समाधान देऊ शकत नाही. एकमेकात भांडणे लावून सत्तेची पोळी भाजण्यात मशगुल असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  आयोजित हल्लाबोल यात्रेत मंगळवारी (दि. 23) सेलू येथे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, चित्राताई वाघ, भावना नखाते, माजी खा. गणेशराव दूधगावकर, सुरेश जाधव, आ. राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. मधुसुदन केंद्रे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. विजय भांबळे, जि. प. सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, डॉ. संजय रोडगे, अजय चौधरी, रामराव उबाळे,  सारंगधर महाराज रोडगे, विनायक पावडे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, स्वराजसिंह परिहार, शिवाजी गजमल, अजय डासाळकर, परवेज सौदागर, दत्ता तांबे, राधाकिशन महाराज, प्रदीप ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पवार म्हणाले की, हळूहळू हे शासन शाळा बंद करून ही व्यवस्था भांडवलशाहीच्या घशात टाकण्याची खेळी करत आहे. रोज नवनवीन आदेश काढून शासनाने गोंधळात भरच टाकली आहे. या सरकारमध्ये कोणताच घटक समाधानी नाही. डॉक्टर, वकील, शिक्षक, तरुणवर्ग, एस. टी. कामगार, मेडिकल संघटना, कोतवाल, पोलिस पाटील आदींसह बेरोजगार गरीब माणूसदेखील मेटाकुटीला आला आहे. अशी भयावह परिस्थिती असताना, शासन 4 लाख नोकरदारांची पदमान्यता रद्द करण्याचा घाट रचत आहे. त्यामुळे 4-5 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार नाही. म्हणून हे सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. 

शिवसेनेचा वाघ आता कुठे राहिला? आता तर शेळीसारखी त्यांची अवस्था झाल्याची खोचक टीका त्यांनी केली. आज नारायण राणे मंत्रीपदासाठी सतत सरकारकडे याचना करत असल्याचे चित्र आहे, असेही ते म्हणाले