Fri, May 24, 2019 08:53होमपेज › Marathwada › नांदेड : वसमतमध्ये विजेच्या धक्‍क्‍याने शिक्षकाचा मृत्यू

नांदेड : वसमतमध्ये विजेच्या धक्‍क्‍याने शिक्षकाचा मृत्यू

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 2:14PMवसमत : प्रतिनिधी

वसमत येथील संजीवन केंद्रे (वय ४५) यांचा राहत्या घरी वीजेचा धक्‍का बसून उपचाराला घेऊन जात असताना जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. केंद्रे हे वसमत तालुक्‍यातील गोरखनाथ विद्यालय आंबा चौंढी येथे कार्यरत होते. 

केंद्रे हे मयूर नगर वसमत येथे राहत होते. दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वा आपल्या रहात्या घराच्या कंपाऊंडमधील लोखंडी गज दुसर्‍या ठिकाणी ठेवत आसताना मुख्य वीज वाहिणीचा लोखंडी गजाला स्‍पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्‍का बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी नांदेण रुग्णलयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी वसमत शहर पोलिसात लक्ष्मण लहाने यांनी या घटनेची माहिती दिली आहे. केंद्रे यांच्यावर अंत्यसंस्‍कार उमरगा या त्‍यांच्या मुळगावी होणार आहे.