Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Marathwada › कुंटणखाना चालविणार्‍या मायलेकाला ठोकल्या बेड्या

कुंटणखाना चालविणार्‍या मायलेकाला ठोकल्या बेड्या

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 09 2018 12:09AMबीड : प्रतिनिधी

येथील धानोरा रोड परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कुंटणखाना चालविणार्‍या आई आणि मुलास ताब्यात घेतले. यामध्ये एका महिलेची सुटका करून त्या मायलेकराला बेड्या ठोकल्या.  

पोलिसांच्या माहितीनुसार 65 महिला ही आपल्या 30 वर्षीय मुलाच्या मदतीने कुंटणखाना चालवित होती. धानोरा रोड भागात त्यांचे दोन मजली घर आहे. तर तिसर्‍या मजल्यावर हा व्यवसाय चालविण्यासाठी एक खोली तयार केली आहे. ग्राहकांकडून मागणी येताच हे दोघेजण महिला व मुलींना बोलावून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 बुधवारी सकाळी याची माहिती पोलिस उपनिरीक्षक भारत माने, दीपाली गिते यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना ही माहिती कळविली. त्यांच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, भारत माने, दीपाली गिते, सिंधु उगले, मीना घोडके, शेख शमिम पाशा, गोरख राठोड यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवून त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाची शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.