Sat, Jul 11, 2020 22:20होमपेज › Marathwada › वाशिम : 'त्या' कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू 

वाशिम : 'त्या' कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू 

Last Updated: May 29 2020 1:44PM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा

वाशीम येथील कोरोना बाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात पहाटे २ वाजता मृत्यू झाला. ८ मे रोजी हृदयरोगाच्या उपचारासाठी सावंगी जिल्हा वर्धा येथे दाखल झाले होते. सोबतच पॅरालिसिस आणि रक्तदाबाने त्रस्त होते. १० मे रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले होते. 

या ६३ वर्षीय रुग्णाची प्रकृती मागील ८ दिवसांपासून गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटरसुद्धा लावण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आज पहाटे दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धेतच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.