Mon, Aug 19, 2019 05:05होमपेज › Marathwada › बारावी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

बारावी परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:51PMशिरूर : प्रतिनिधी

बारावीच्या परीक्षेला सर्वत्र सुरुवात झाली असताना शिरूर शहरात मात्र  याही वर्षी अपेक्षेप्रमाणे कॉपीयुक्त वातावरणात परीक्षा पार पडत आहेत. 

शहरातील कालिकादेवी महाविद्यालय आणि महात्मा फुले विद्यालय या दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू असून कालिकादेवी महाविद्यालयात एकूण 1002 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 40 पर्यवेक्षक असून केंद्रसंचालक आणि रनर (सहसंचालक)आहेत, तसेच महसूलचे आणि शिक्षणविभागाचे प्रत्येकी एक बैठे पथक आहे. तर महात्मा फुले या महाविद्यालयात 318 विद्यार्थी परीक्षा देत असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 13 पर्यवेक्षक, एक संचालक, एक रनर आणि महसूलचे, शिक्षणविभागाचे एक बैठे पथक असूनही कॉप्या सुरूच आहेत. 

परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू असताना देखील पालक मोठ्या प्रमाणावर पाल्याना कॉप्या पुरविण्यासाठी येत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस बंदोबस्त अपुरा असल्यामुळे बाहेरच्या गर्दीला आम्ही प्रतिबंध करू शकत नाही
ः बी. आर. जायभाये, प्राचार्य, महात्मा फुले महाविद्यालय.