Thu, Jun 27, 2019 10:22होमपेज › Marathwada › शासन निर्णयाची होळी करीत कंत्राटी कामगारांनी केला शिमगा

शासन निर्णयाची होळी करीत कंत्राटी कामगारांनी केला शिमगा

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:35AMजालना : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार, 1 मार्च रोजी सकाळी कंत्राटी कर्मचारी समन्वय कृतिसमितीच्या वतीने 9 फेब्रुवारी  2018 रोजीच्या कंत्राटी कर्मचार्‍यांवर अन्याय करणार्‍या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी घोषणा देऊन कामगारांनी शासनाच्या नावाने शिमगा करीत अभिनव आंदोलन केले.

शासन निर्णयात कंत्राटी कर्मचार्‍यांना तीन वर्षे सेवा झाल्यानंतरही  पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे अनेक वषार्र्ंपासून शासनाच्या विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे  सेवेत कायम होण्याचे स्वप्न  धुळीस मिळाले आहे. या अनुषंगाने नुकतेच 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. शासन निर्णय रद्द न केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कर्मचारी समन्वय कृतिसमितीच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी जिल्ह्यात विविध विभागांत काम करणारे कंत्राटी अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.