Fri, Nov 16, 2018 02:25होमपेज › Marathwada › मुख्यमंत्र्यांनी काढला जेसीबीबरोबर सेल्फी

मुख्यमंत्र्यांनी काढला जेसीबीबरोबर सेल्फी

Published On: Mar 04 2018 11:06AM | Last Updated: Mar 04 2018 11:06AMनागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर जेसीबी व पोकलॅन मशिनसोबत सेल्फी काढला. 

भारतीय जैन संघटनेच्या पथदर्शी कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यापासून होत असून,  यासाठी ‘बीजेएस’ने 134 जेसीबी/पोकलॅन मशिन्स खरेदी केल्या आहेत. एका वर्षात चार कोटी क्युबिक मीटर गाळ काढून किमान 50 हजार एकर जमीन सुपीक करून सुमारे 28 अब्ज लिटर पाणी  साठविण्याची क्षमता वाढविणार्‍या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी,  येथील ए.आर.डी. मॉलसमोरच्या पटांगणात पार्क करण्यात आलेल्या 134 जेसीबी/पोकलॅन मशिनसोबत सेल्फी काढण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत नितीन  गडकरी, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, खा. प्रतापराव जाधव, खा. रक्षा खडसे, बीजेएसचे शांतीलाल मुथ्था व इतर मान्यवर उपस्थित होते.