Wed, Sep 19, 2018 12:47होमपेज › Marathwada › #Women’sDay पोहेटाकळीतील स्वच्छता दूत

#Women’sDay पोहेटाकळीतील स्वच्छता दूत

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMपाथरी : सुधाकर गोंगे

तालुक्यातील  49 ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आहेत. पोहेटाकळी येथे तर सरपंच महिला, उपसरपंच महिला एवढेच नव्हे तर ग्रामसेवकदेखील महिला चित्र आहे, पण या तिन्ही महिलांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न तर केलेच, पण गाव हागणदारीमुक्त करून एक आदर्श निर्माण केला आहे.

पाथरीपासून जवळच असलेल्या या पोहेटाकळी गावांमध्ये छाया भागात कुल्थे या सरपंच आहेत. सुभद्राबाई जनार्दन गोंगे या उपसरपंच आहेत. त्यांच्या जोडीला ग्रामसेवकदेखील वैशाली पाटील आहेत.
याही तिन्ही महिलांनी पुरुषांच्या डोळ्यांत अंजन घालणारा गावाचा कायापालट केल्याचे दिसून येते.

गावातील दुर्गंधी दूर करून गावातील ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी आग्रह करून गावाला हागणदारीमुक्त करण्यात याही महिला पदाधिकारी आणि  महिला ग्रामसेवक याचा वाटा आहे. ग्रामपंचायतीत महिला किती चांगला कारभार करू शकतात  हा आदर्श निर्माण केला आहे.