Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Marathwada › पालिका-महावितरण वादात शहर अंधारात

पालिका-महावितरण वादात शहर अंधारात

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 10 2018 9:43PMबीड : प्रतिनिधी

शहरातील दहा हजार पथदिवे तीन दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी शहरात अंधाराचे साम्राज्य आहे. बीड शहरात मीटर बसविण्याचा निर्णय झाला होता, मात्र मीटर न बिसविताच पालिकेला बिल देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सरासरी आलेले बिल भरावे की भरू नये, असा पेच पालिकेसमोर निर्माण झाला आहे.  

गेल्या दहा वर्षांत पांगरी रोड, बार्शी नाका, जालना रोड, नाळवंडी नाका, पालवन रोड, धानोरा रोड या भागात नागरी वस्त्या झाल्या आहे. यासह बीड शहरातील सुभाष रोड, पांगरी रोड, नगररोेड, रविवार पेठ, मोंढा रोड, स्टेडियम परिस, बशीरगंज, भाजी मंडई अशा सर्व ठिकाणी पालिकेकडून पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरात सरासरी दहा हजार पथदिवे असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून महावितरणने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. 

सुभाष रोड, पांगरी रोड, अंबिका चौक, कारंजा रोड, स्टेडिअम परिस या मार्केटच्या भागात रात्री उशीरापर्यंत नागरिक खरेदी करतात. काही ठिकाणी रात्री आठ ते नऊ पर्यंत मुली, तरुणी शिकवणी वर्गासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी महिला, मुली यांना रात्री घरी येताना भीतीचे वातावरण तयार झाले आहे. रात्री शहरात अंधार असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असून शहरात चोर्‍यांचे प्रमाणही वाढू शकते. बीड पालिका व महावितरण यांच्या प्रमुख अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांसमवेत बैठक झाली होती. या बैठकीत पथदिव्यांना मीटर बसविण्याचे पालिकेने सुचविले होते. त्या अनुषंगाने आता कामही सुरू आहे. मात्र, पालिकेला सध्या आलेले विद्युत बिलही सरासरीचे आहे. त्यामुले पालिकेने डिसेंबर व जानेवारी या महिन्याचे बील (सरासरी अकरा लाख) भरलेले नाही. तर, दुसरीकडे वसुलीची मोहीम महावितरणनने सुरू केल्याने कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महावितणने पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.