Tue, Jan 22, 2019 01:28होमपेज › Marathwada › उस्‍मानाबाद : महावितरणचा लाचखोर अभियंता जाळ्यात

उस्‍मानाबाद : महावितरणचा लाचखोर अभियंता जाळ्यात

Published On: Feb 02 2018 8:58PM | Last Updated: Feb 02 2018 8:58PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

नवीन डीपी (रोहित्र) बसविण्यासाठी शेतकर्‍यांकडून एक लाखाची लाच घेणार्‍या तिघा अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुरुममोड (ता. उमरगा) येथे आज सायंकाळी ही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले, की तक्रारदार हा द्राक्षबागायतदार शेतकरी आहे. त्यांच्या शेतात जुना डीपी नादुरुस्त झालेला होता. तो दुरुस्त केल्याची व नंतर नवीन डीपी बसविण्यासाठी लाच म्हणून महावितरणचा नळदुर्ग येथील सहायक अभियंता सुधीर त्र्यंबक बुरनापल्‍ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदारखान युसुफखान पठाण यांनी दीड लाखांची लाच मागितली. दरम्यानच्या काळात शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर आज सायंकाळी मुरुममोड येथे वीज कंपनीचा खासगी गुत्तेदार पांडुरंग सिध्दराम जाधव याने बुरनापल्‍ले यांच्या निर्देशानुसार एक लाखांची लाच स्वीकारली. त्यावेळीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांवरही मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे, निरीक्षक विनय बिहीर, बी. जी. आघाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.