होमपेज › Marathwada › चव्हाण हत्या प्रकरण : आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

चव्हाण हत्या प्रकरण : आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: Jul 03 2018 6:32PM | Last Updated: Jul 03 2018 6:32PM प्रतिनिधी : लातूर

लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश बाबूराव चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती.  अटकेत असलेल्या या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्‍याने  आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी ७ जुलै पर्यंत वाढवली आहे.  

आरोपीमध्ये प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, महेशचंद्र प्रभाकरराव घोगडे, करण चंद्रपालसिंग गहिरवार, शरद सुर्यकांत घुमे, अक्षय भिवा शेंडगे यांचा समावेश आहे. २४ जून रोजी रात्री लातूर येथील शिवाजी शाळेनजिक अविनाश यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून करणयात आला  होता. दरम्यान आरोपींना पहाण्यासाठी नागरीकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती.