Fri, Jul 19, 2019 22:57होमपेज › Marathwada › आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 12:02AMबीड : प्रतिनिधी

शेती नावावर करून दे, असे म्हणत शेतकर्‍याला आठ ते नऊ जणांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शेतकर्‍यास धमकी देणार्‍या नऊ जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिरसाळा पोलिस ठाण्यात उषा दिलीप राठोड (34) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती दिलीप पांडुरंग राठोड यांच्या हिस्स्याची शेती नावे करून देत नसल्याने आठ ते नऊ जणांनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे पती दिलीप राठोड यांनी खारितांडा तहत गोवर्धन हिवरा शिवारातील चिकनी नामक शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस पांडुरंग राठोड, लाडकाबाई पांडुरंग राठोड, कुंडलिक पांडुरंग राठोड, अरुण पांडुरंग राठोड, जनाबाई अरुण राठोड, यशोदा कुंडलिक राठोड, राहुल कुंडलिक राठोड, सचिन कुंडलिक राठोड, रोहित अरुण राठोड (सर्व रा.खारी तांडा तहत गोवर्धन हिवरा ता.परळी) हे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून नऊ जणांविरुद्ध सिरसाळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.