Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Marathwada › गेवराईत शासकीय कार्यालयातील प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई

गेवराईत शासकीय कार्यालयातील प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:33AMगेवराई : विनोद नरसाळे

तालुक्यातील अनेक महत्वाच्या शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांचा कारभार हा अन्य अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार तसेच प्रभारी अधिकार्‍यांवर सुरू आहे. प्रशासकीय कामास उशीर होत असल्याने कामे खोळंबली जात आहेत. तसेच या प्रभारी राज मुळे कर्मचार्‍यावर देखील वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.  

गेवराई तालुक्यात विविध शासकीय कार्यालयातील अनेक महत्वाच्या अधिकार्‍यांच्या कायम नियुक्ती नसल्याने प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तालुका व शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी पदाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. तालुक्यातील रस्ते विकास कामाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग या कार्यालयात देखील उपअभियंता तसेच काही जागा रिक्त असून याठिकाणी ही उपअभियंता म्हणून अतिरिक्त पदभार अन्य अधिकार्‍याकडे देण्यात आलेला आहे. या कार्यालयात अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. 

सध्या तालुका महावितरण कार्यालयातील उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्याची अन्य जागा रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी या अधिकार्‍याचे पदे रिक्त असून अतिरिक्त पदभार अधिकारी पाहत असल्याने अधिकारी केव्हा तरी कार्यालयात दिसून येतात. तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात देखील हिच अवस्था असून अधिकार्‍यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे. यामुळे कामे होण्यास दिरंगाई होत असून अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

महत्त्वाच्या कामांना दिरंगाई
गेवराईतील महत्वाच्या कार्यालयात प्रभारी तसेच अन्य अधिकार्‍यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने अनेक महत्त्वाच्या कामांना दिरंगाई होत आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी कार्यालय, विद्युत महावितरण कार्यालय, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आदी कार्यालयात प्रभारी राज आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी यासह आदी कार्यालयातील अधिकार्‍यांचा अन्य अधिकारी अतिरिक्त पदभार पाहत आहेत.