Fri, Jul 19, 2019 20:03होमपेज › Marathwada › घरातील सदस्यांएवढ्याच मांजरींचे पालन!

घरातील सदस्यांएवढ्याच मांजरींचे पालन!

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 12:09AMआष्टी : सचिन रानडे 

कुणाला कशाची हौस असेल सांगता येत नाही मात्र प्राणी मात्रावर प्रेम करणाराही एक वर्ग आहे. आणि असेच एक कुटुंब आष्टी येथे आहे.की, ज्या कुटुंबात एकूण सोळा सदस्य आणि त्यांच्याकडे मांजरीही सोळाच असल्यामुळे माणसाप्रमाणे त्या या घरात वावरतात. अशावेळी कुटुंबप्रमुख असलेल्या म्हस्के यांना याबाबत विचारल्यावर मात्र ते थोडे दुःखी होतात आणि यामागचे कारण सांगतात.

महादेव म्हस्के हे सहकार क्षेत्रातील ऑडीटर म्हणून काम करतात. पाच वर्षांपूर्वी ते त्यांच्या घराकडे येत असताना त्यांना रस्त्यावर एक मांजराला चारचाकी वाहन धडक देऊन गेलेले आढळून आले. या अपघातात त्या मांजराचा पुढील उजवा पाय तुटल्याने ते तडफडत होते. अशावेळी म्हस्के यांनी त्या मांजराला पशू वैद्यकीय अधिकारी यांना दाखवून त्याच्यावर जामखेड येथेही उपचार घेतले नंतर ते मांजर घरी आणून त्याला दुध पाजले. यावेळी ते मांजर त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे वावरू लागले. कालांतराने तिला पिल्ले झाली. ती कुठे सोडली तर आईप्रमाणेच त्यांचेही हाल होतील म्हणून त्यांनी त्यांचे ही पालन पोषण केले आणि बघता बघता आता त्यांच्या घरात तब्बल 16 मांजरी आहेत आणि पोटच्या मुलाप्रमाणे महादेव म्हस्के आणि नैना म्हस्के हे दांम्पत्य त्यांची काळजी घेत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकीला नाव आहे, कुणाचे राणी, मुकू, लालू, कालू, शोभा येलीन, मार्गो आदी नावे ठेवण्यात आहेत. घरातील कुठलाही सदस्याने हाक मारताच ती जवळ येतात. हे विशेष जणू माणसाप्रमाणे त्यांची वागणूक म्हस्के घराण्यात दिसून येत आहे.