Thu, Sep 20, 2018 03:57होमपेज › Marathwada › परळीत शिवसेना तालुकाप्रमुखांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न

परळीत शिवसेना तालुकाप्रमुखांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न

Published On: Jan 04 2018 3:17PM | Last Updated: Jan 04 2018 3:17PM

बुकमार्क करा
परळी वैजनाथः प्रतिनिधी 

मंगळवारी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांततेत पार पडत असलेल्या बंदने रात्री हिंसक वळण घेतले. शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके यांची गाडी रात्री ११.३० च्या दरम्यान समाजकंटकांनी पेटविण्याचा प्रयत्न केला.

होळकर चौक भागात शिवसेना तालुका प्रमुख यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची गाडी टाटा इंडिका विस्टा(एम. एच. ४४ जी ८९) घराबाहेर पार्क केलेली होती. बुधवारी रात्री ११.३० च्या दरम्यान काही समाजकंटकांनी पेट्रोल टाकून गाडीच्या समोरील भाग पेटवून दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून समोरील दोन्ही टायर जाळून खाक झाल्या आहेत. दरम्यान गणेशपार भागात सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी नागरिकांनी करून देखील म्हणावा तेवढा पोलीस बंदोबस्त मिळालेला नव्हता.