Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Marathwada › बस उलटली; 11 प्रवासी गंभीर, 17 किरकोळ जखमी

बस उलटली; 11 प्रवासी गंभीर, 17 किरकोळ जखमी

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:34AMकळमनुरी : प्रतिनिधी

नगर-उमरखेड मार्गावर भरधाव जाणारी बस (क्रमांक एमएच 40 ए.क्यू 6345) शुक्रवारी दि.23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास, कळमनुरी येथून जवळच असलेल्या बिबगव्हाण फाट्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून उलटी झाली. या अपघातात 11 प्रवाशी गंभीर जखमी झाले तर 17 प्रवाशांना किरकोळ दुखापत झालीे.

या अपघातात माधव कांबळे, कौशल्या वर्मा, वर्षा कांबळे, गौतम कांबळे, ऐश्‍वर्या कांबळे रा.शेंबाळ पिंपरी, जोहराबी मोहंमद युसूफ रा.सोलापूर, महानंदा पुरी रा.परभणी, गणपत टोबाजी कुबडे रा.उमरखेड, धम्मशील नगराळे रा.खांबाळी, बालाजी हरकरे रा.विडूळ, देविदास पवार, ताजमूल नाईक, शेख जुबेर शेख जऊर रा.कळमनुरी, चांदोजी गायकवाड रा.मुळावा, रावसाहेब कदम, शेख शफी शेख इब्राहिम रा.शेवाळा, सय्यद हुसेन नुर, अर्जून शिंदे, दिपाली शिंदे, साहेबराव शिंदे रा.आजरसोंडा, किशोर मधुकर लवखे रा.आर्णी यांच्यासह 28 प्रवाशी जखमी झाले असून यापैकी सहा प्रवाशी घटनास्थळावरूनच नांदेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

जखमींमध्ये बसचा चालक व वाहकाचा समावेश आहे. जखमीपैकी वर्षा कांबळे, जोहराबी मोहंमद युसूफ रा.सोलापूर, महानंदा पुरी रा.परभणी,अर्जून शिंदे, किशोर मधुकर नवखे रा.आर्णी यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी.एस.राहिरे, सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने जखमींना कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. जखमींची संख्या जास्त असल्याने कळमनुरी येथील खाजगी व्यवसाय करणार्‍या डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.दुर्गे, डॉ.आनंद मेने, डॉ.फरीदा गोहर, डॉ.शोफीया खान आदींनी त्यांच्यावर उपचार केले.