होमपेज › Marathwada › हिंगोलीत बस पलटी होऊन २८ जखमी

हिंगोलीत बस पलटी होऊन २८ जखमी

Published On: Feb 23 2018 7:44PM | Last Updated: Feb 23 2018 7:43PMकळमनुरी : प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्यातील नगर - उमरखेड  रस्त्यावर बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ११ प्रवाशी गंभीर तर १७ जण किरकोळ जखमी झाले आहेत.आज (शुक्रवार) सायंकाळच्या सुमारास बिबगव्हाण फाट्याजवळ ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमरखेड आगाराची बस क्रमांक एमएच 40 ए क्यू 6345 ही बस नगर येथून उमरखेडकडे निघाली होती. कळमनुरी येथून जवळच असलेल्या बिबगव्हाण फाट्याजवळ बस आली असता चालकाचा बस वरील ताबा सुटला. यावेळी भरधाव असणारी ही बस एका झाडावर आदळून पलटी होवून काही अंतर फरफटत गेली. यामध्ये माधव कांबळे, कौशल्या वर्मा, वर्षा कांबळे, गौतम कांबळे, ऐश्‍वर्या कांबळे रा.शेंबाळ पिंपरी, जोहराबी मोहंमद युसूफ रा.सोलापूर, महानंदा पुरी रा.परभणी, गणपत टोबाजी कुबडे रा.उमरखेड, धम्मशिल नगराळे रा.खांबाळी, बालाजी हरकरे रा.विडूळ, देविदास पवार, ताजमुल नाईक, शेख जुबेर शेख जऊर रा.कळमनुरी, चांदोजी गायकवाड रा.मुळावा, रावसाहेब कदम, शेख शफी शेख इब्राहिम रा.शेवाळा, सय्यद हुसेन नुर, अर्जून शिंदे, दिपाली शिंदे, साहेबराव शिंदे रा.आजरसोंडा, किशोर मधुकर लवखे रा.आर्णी यांच्यासह 28 प्रवाशी जखमी झाले.

जखमींना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर काही गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले आहे.