Tue, Nov 20, 2018 17:28होमपेज › Marathwada › लाच मागणारा पोलीस एसीबीच्या गळाला

लाच मागणारा पोलीस एसीबीच्या गळाला

Published On: Jan 06 2018 8:32PM | Last Updated: Jan 06 2018 8:32PM

बुकमार्क करा
 

लातूर :प्रतिनिधी

पासपोर्टसाठी लागणारा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या चाकूर येथील एका पोलीस कर्मचाऱ्या विरुध्द तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून ही कारवाही करण्यात आली आहे. बळीराम पंढरीनाथ गादगे असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार व त्याच्या भावास पासपोर्ट काढावयाचा होता. त्यासाठी चारित्र्य अहवाल मिळणे गरजेचे होते. त्या कामासाठी तक्रारदा रास गादगे याने चार हजाराची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीला कळवले होते.अडीच हजारावर पंचासमक्ष तडजोड झाली होती.तथापि शंका आल्याने गादगे याने रक्कम स्वीकारली नाही. लाच मगितलीच्या पुराव्यावरून त्याच्याविरुद्ध कारवाही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.