Tue, May 21, 2019 04:21होमपेज › Marathwada › मराठवाडा : गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयाची तोडफोड

मराठवाडा : गटशिक्षणाधिका-यांच्या कार्यालयाची तोडफोड

Published On: Apr 07 2018 9:26PM | Last Updated: Apr 07 2018 9:26PMकंधार (मराठवाडा) : प्रतिनिधी

कंधार येथील गटशिक्षणाधिकारी बालाजी कपाळे यांच्या कार्यालयात माधव मुंडे व इतर पाच अनओळखी व्यक्तीनी घुसून कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी मुंडे आणि इतर सहकाऱ्यांनी निम का पत्ता कडवा है कपाळे साहेब भंडवा है अशा जोरजोरात घोषणा देत त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात सहा जणांवर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, १५ मार्च रोजी कंधार पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी बालाजी कपाळे यांच्याविरूद्ध एका महिला शिक्षकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यासर्व प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच गोंधळ उडाला होता. तर हे प्रकरण संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. 

आज शनिवार (७ एप्रिल) दुपारी १२.३० च्या सुमारास शिक्षिका जयश्री मुंडे यांचा भाऊ माधव मुंडे व इतर पाच अनओळखी व्यक्ती हे  गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आले. यावेळी मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कपाळे यांच्यासंबंधी चौकशी केली. तर इतर मुंडे यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात घुसून निम का पत्ता कडवा है कपाळे साहेब भंडवा है असे जोरजोरात घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील संगणक, टी.व्ही, टेबल, खुर्चीची मोडतोड करत कपाळे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. तर कार्यालयात कपाळे यांना शिवीगाळ करत ते निघून गेले.  

या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक अविनाश पांचाळ यांच्या फिर्यादीवरून माधव मुंडे यांच्यासह इतर पाच जणांविरूद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गंगापुरकर करीत आहेत.

 

Tags : Marathwada, Marathwada news, Kandhar, Balaji Kapale, education officer, break office,