Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Marathwada › डीजेच्या आवाजात ब्रास बॅन्डचा वाजला बाजा 

डीजेच्या आवाजात ब्रास बॅन्डचा वाजला बाजा 

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 12:41AMआष्टी : सचिन रानडे 

लग्न सराई, मुंज, वाढदिवस, एवढेच नाही तर अंत्यसंस्कार, दहावा, तेरावा आदी ठिकाणी चालत असलेली प्रथा म्हणजे पारंपारिक वाद्यवादन. मात्र मराठमोळी वाद्यसंस्कृतीची ओळख असणारे ब्रास बँन्ड पथके डीजेच्या आवाजाने कालबाह्य होत चालली असून यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सूर, हलगी, ताशा, ढोलकी, खुळखुळा, सनई, तुतारी, बासरी याच्या सहाय्याने अनेक कलाकार निर्माण झाले. ग्रामीण भागात या निमित्ताने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. यातून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू लागला. 

मात्र आधुनिकतेच्या अनुकरणात या सर्व वाद्यांची जागा डीजेने घेतली आणि ब्रास बॅन्ड असेल, सनई वादनाचा चमू असेल, ग्रामीण भागातील हलगी पथक असतील यांच्यावर माञ या डीजेने चांगलीच गदा आणली आणि यामुळे 15 ते 20 जणांच्या वाद्य वाजविणार्‍या चमूच्या जागी 3-4 जणांचीच आवश्यकता असणार्‍या डीजेने घेतल्याने या कलाकारांवर उपासमार करण्याची वेळ आल्याने नाईलाजास्तव कुटुंब चालविण्यासाठी त्यांना इतर कामे करण्याची वेळ आली.