परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले

Last Updated: Feb 26 2020 7:46PM
Responsive image
संग्रहित फोटो


मानवत : प्रतिनिधी 

तालुक्‍यातील ईटाळी शिवारात असलेल्या जायकवाडीच्या कॅनॉलमध्ये सोमवारी (दि. २४ रोजी) दुपारच्या सुमारास एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडला. त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पण आज देखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले असून यात अखेर अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात यापुर्वीही गेल्या महिनाभरात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

आघाडी सरकारची झोप उडविणार : खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील इटाळी शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कॅनॉलच्या गेट क्रमांक ६१ च्या येथे एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह गेटपासून अंदाजे पुढे १ किमी अंतरावर सापडला असून त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पीएसआय नागनाथ तुकडे, एपीआय जाधव यांचेसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचे गांभीर्य पहाता श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.

सुट्टीच्या ३ दिवसांत ६१ लाखांची कर वसुली

वैद्यकीय अधिकारी यांच्या शवविछेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार ए.एस.आय. ताटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पीएसआय नागनाथ तुकडे हे करीत आहेत.

परिसरातील खुनाच्या घटनांचा अद्याप तपास सुरू    

मानवत तालुक्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत उक्कलगाव, रामपुरी बु, ताडबोरगाव येथे निर्घृण खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ताडबोरगाव खून प्रकरणाचा तपासही सुरू आहे. त्यातच आता हा मृतदेह सापडला आहे. त्याचीही ओळख पटलेली नाही.  
- प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजी पवार