Sat, Nov 17, 2018 14:58होमपेज › Marathwada › महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 10:19PMपरभणी ः प्रतिनिधी

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 30 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता उघडकीस आली आहे. पांडुरंग दशरथ गव्हाणे (20 वर्षे, रा. सिंगणापूर, ता. जि. परभणी) असे मृत युवकाचे नाव आहे. येथील  वसमत रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पांडुरंगाचा मृत्यदेह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दगडी मुलांच्या वसतिगृहासमोरील विहिरीत आढळून आला.

यासंदर्भात माहिती मिळताच नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. याप्रकरणी 1 जुलै रोजी मुलाचे वडील दशरथ पांडुरंग गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नायक माधव दंडे हे करीत आहेत.