Sun, Jul 05, 2020 22:39होमपेज › Marathwada › बीड : नवविवाहित दाम्पत्याचे विहिरीत मृतदेह आढळले

बीड : नवविवाहित दाम्पत्याचे विहिरीत मृतदेह आढळले

Last Updated: May 28 2020 8:08PM

संग्रहीक छायाचित्रगेवराई : पुढारी वृत्तसेवा 

एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून, आकस्मीत मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या नवविवाहित दाम्पत्यांनी आत्महत्या केली की अन्य कोणते कारण यामागे आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

वाचा :

सुनील बाबासाहेब चव्हाण (वय २१) व मनिषा सुनिल चव्हाण (वय २० वर्षे) रा.चव्हाणवाडी तांडा ता गेवराई जि.बीड असे विहिरीत मृतदेह आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते. दरम्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह गावा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीत तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुर्डे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर दोघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी उमापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. सदरील नवविवाहित दाम्पत्यांनी आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली ? हे अद्याप स्पष्ट नाही. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

वाचा :बीड : स्कॉर्पिओ पलटी; एक पोलिस जागीच ठार

मनिषा ही विहिरीत पडल्यानंतर सुनीलने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला? असे देखील बोलले जात आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर घटनेचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुर्डे यांनी सांगितले.

वाचा : बीड : बोरीत बारा पोलिसांची कोरोना चाचणी