Sat, Nov 17, 2018 18:40होमपेज › Marathwada › काळ्या बाजारात जाणारा 200 पोती तांदूळ पकडला

काळ्या बाजारात जाणारा 200 पोती तांदूळ पकडला

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:03AMमाजलगाव : प्रतिनिधी  

पाथरी तालुक्यातील (जि. परभणी) तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामातून काळ्या बाजारात जाणारा 200 पोते तांदूळ माजलगाव शहराजवळील पवारवाडी फाट्याजवळ पोलिसांनी पकडला. ही कारवाई मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केली. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

सुटी असताना पाथरी तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामातून तांदळाचे 200 पोते भरून टेम्पो (क्र.एमएच 45 ए डी.  0174)  रात्री माजलगाव मार्ग काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके व कर्मचारी देशमुख, शैलेश गादेवाड, अशोक क्षीरसागर, गंगाधर कांबळे, विजय केळगद्रे यांनी राष्ट्रीय माहामार्गावरून जाणारा टेम्पो पकडला. टेम्पो चालक मुकरोद्दीन नसरोद्दीन फारोखी व सय्यद दिवान यांना ताब्यात घेतले. टेम्पो ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या चौकशी सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.