Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Marathwada › धक्कादायकः आजार दूर करतो, चाळीस दिवस येथे रहा

धक्कादायकः आजार दूर करतो, चाळीस दिवस येथे रहा

Published On: Dec 20 2017 9:41AM | Last Updated: Dec 20 2017 9:42AM

बुकमार्क करा

गेवराई : विनोद नरसाळे

आजार दूर करतो म्हणून एका विवाहित महिलेस चाळीस दिवस सैलानी बाबा येथे रहाण्यास ये अशी भोंदूगिरी भोंदूबाबाकडून बोलावणाी होत आहे. सुनेला भोंदूबाबासोबत पाठवण्यास सासुने मज्जाव केल्याने त्याने कुटुंबास चक्क लिंबू, अंगारा, मंत्र भोंदूगिरी करत त्रास देण्यास सुरुवात केल्याने सासून पोलिसात धाव घेतली आहे. त्यामुळे या घटनेने अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या अनिष्ट प्रथा कधी बंद होणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणात पाळली जाते, याची प्रचिती देणारा प्रकार गेवराई शहरात समोर आला आहे.

शहरातील अचानक नगरमधील भोंदूबाबाची भोंदूगिरी समोर येऊ लागली आहे. गेवराई येथे राहणार्‍या एका विवाहित महिलेला आजार असल्याचे सांगत हा भोंदूबाबा या महिलेस चाळीस दिवस सैलानी बाबा येथे माझ्यासोबत रहा; आजार पूर्णपणे बरा करतो म्हणून भोंदूगिरी करत आहे. मात्र या महिलेच्या सासुने विरोध दर्शविल्याने चिडलेल्या भोंदूबाबाने आता तर या घरात लिंबू, अंगारा घरात तसेच पाण्यात टाकून अंधश्रद्धेचा कळस गाठून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या सासुने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या भोंदूबाबावर कारवाई करावी अशी मागणी सासूने निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकेड केली आहे.

सुनेच्या अंगात बाबा
आता तर चक्क सुनेच्या अंगात भोंदूबाबा येऊ लागले आहेत. सुनेची आई व नातेवाईक हे देखील तिला भोंदूबाबासोबत का जाऊ देत नाही म्हणून नाहक त्रास देत असल्याचे या सासुचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या जर या भोंदूबाबाच्या नादात सुनेने जिवाचे काही केल्यास अशी काळजी सासुला लागली आहे. यामुळे भोंदूबाबावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सासुने केली आहे.

जादूटोणा विरोधी कायदा असतानाही काही ठिकाणी अजूनही भोंदूगिरी चालू आहेच. अशा भोंदूगिरी करणार्‍यांवर कारवाई करून त्यांना गजाआड टाकले पाहिजे. त्याचबरोबर आपणही समाजाचा एक भाग असून सर्वांनी समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मुलनावर जनजागृती करून प्रबोधन केले पाहिजे.
-आनंद सुतार, सामाजिक कार्यकर्ते, गेवराई.