होमपेज › Marathwada › भीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी 

भीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी 

Published On: Jan 02 2018 12:28PM | Last Updated: Jan 02 2018 12:28PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटले. विविध भागात जमावाने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे खबरदारी म्हणून शाळा व्यवस्थापनांनी दुपारनंतर शाळा सोडून दिल्या आहेत. 

टि. व्ही. सेंटर भागात सकाळीच दगडफेक झाली. त्यानंतर सोशल मीडियावरुन लगेचच ही बातमी वार्‍यासारखी शहरभर पसरली. पाठोपाठ गादियाविहार, सातारा परिसर, मुकूंदवाडी आदी भागात जमावाने फिरुन दुकाने आणि इतर प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनांनी खबरदारी म्हणून शाळा मध्येच सोडल्या. सातारा परिसरातील मॉरल किडस, चाटे स्कूल, उज्वलाताई पवार शाळा, संघर्षनगरातील पिनाकेश्‍वर हायस्कूल आदींनी अर्ध्याच वेळेत शाळा सोडून दिल्या. पोद्दार इंटरनॅशनल, जैन इंटरनॅशनल आदी शाळांमध्ये दुपारचे वर्ग भरलेच नाहीत.