Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Marathwada › भीमा कोरेगाव प्रकरणी भारिपचे धरणे आंदोलन

भीमा कोरेगाव प्रकरणी भारिपचे धरणे आंदोलन

Published On: Mar 04 2018 1:41AM | Last Updated: Mar 03 2018 11:41PMमाजलगाव : प्रतिनिधी 

येथील तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धम्मानंद साळवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना अटक करण्यासह दलित तरुणांवर दाखल केलेले गुन्हे वापस घेण्यात यावे  अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

भीमा कोरेगावप्रकरणी आंदोलन करणार्‍या दलित तरुण व नागरिकांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. याची दखल घेऊन गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसह   मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.  यासाठी तहसील कार्यालयावर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, तालुकाध्यक्ष धम्मानंद साळवे, जिल्हा उपध्याक्ष अंकुश जाधव, श्रीमंत डोंगरे, क्षीरसागर दादा, अशोक मगर, तालुका उपाध्यक्ष डॉ. सुहास टाकणखार, दिनेश निसर्गंध, प्रकाश सरवदे, एस.बी.मोरे, कसबे शत्रूग्घन, प्रवीण ओव्हाळ, सूरज कुव्हारे, समाधान गायकवाड, संकेत खळगे, योगेश जाधव,  विशाल सोनपसारे, मोहन कुटे यांच्यासह भारिप बहुजन माहासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेकपाचे भाई अ‍ॅड. नारायण गोले पाटील व माकपचे मुस्सदिक बाबा, अ‍ॅड. सय्याद याकूब यांनीही या आंदोलानास पाठिंबा दिला.