Tue, May 21, 2019 04:58होमपेज › Marathwada › केंद्राचे बजेट म्हणजे निव्वळ जुमलेेबाजी 

केंद्राचे बजेट म्हणजे निव्वळ जुमलेेबाजी 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:38AMपरभणी : प्रतिनिधी

केंद्र सरकारचे सादर झालेले बजेट म्हणजे निव्वळ जुमलेेबाजी असल्याचा आरोप भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा माजी खा.डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी परभणीत केला.

शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात केंद्रीय अंदाजपत्रक(अर्थसंकल्प) 2018-19 एक दृष्टिक्षेप या विषयावर 14 फेबु्रवारी रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.के.के.पाटील हे होते. यावेळी बी.एच.सहजराव यांची उपस्थिती होती. यावेळी मुणगेकर म्हणाले की, असंघटित उद्योगासाठी या बजेटमध्ये सरकारने काहीही केलेले नाही. देशात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात मोठी रोजगार निर्मिती होत असते. त्यासाठी बजेटमध्ये अत्यंत तुटपुंजी तरतूद केली आहे. मात्र ज्या उद्योगांत पाचपेक्षा कमी लोक काम करतात त्यासाठी भरघोस तरतूद केल्याचे दिसते. खासगी विमा कंपनी आणि हॉस्पिटल्सना  फायदा करून देण्यासाठी 10 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांचा विमा देण्याची योजना हा निव्वळ खोटेपणा आहे. चार वर्षांत सरकारने धान्याच्या किमती 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढविल्या नाहीत. शेतीतील उत्पादनावर शेतकर्‍यांना 50 टक्के भाव वाढवून देऊ असे म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांनी निव्वळ फसवणूक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रास्ताविक राहुल मोगले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुनील मोडक यांनी तर आभार गौतम भालेराव यांनी मानले. कार्यक्रमासाठी जतिन पानपट्टे, गौतम मस्के, राज मस्के, शंकर गायकवाड, वैजनाथ टोमके, सिध्दार्थ बानमारे, राहुल सोनवणे, देवानंद नरवाडे, सोमेश परसोडे आदींनी परिश्रम घेतले.