Sun, Jan 19, 2020 15:11होमपेज › Marathwada › बीड : वडवणीत शेतक-याची आत्महत्या

बीड : वडवणीत शेतक-याची आत्महत्या

Published On: Jul 16 2019 10:29PM | Last Updated: Jul 16 2019 10:29PM

वडवणी : प्रतिनिधी 

वडवणी (जि. बीड) येथील कवडगावातील शेतक-याने कर्जबाजारपणाला कंटाळून झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. मंगलदास काळे (वय ४०) असे या शेतक-याचे नाव आहे. वडवणी पोलीसांनी घटनास्थाळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वडवणीच्या प्राथमीक आरोग्य केंद्राच दाखल केला.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगलदास काळे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेवा सहकारी सोसीयटी आदींचे जवळपास दोन लाख रूपयांचे कर्ज होते. काळे यांची दोन एकर कोरडवाहू शेत आहे. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून काळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.