Thu, Oct 17, 2019 03:18होमपेज › Marathwada › गरम पाणी अंगावर पडून दोन बालकांचा मृत्यू 

गरम पाणी अंगावर पडून दोन बालकांचा मृत्यू 

Published On: Dec 31 2017 4:49PM | Last Updated: Dec 31 2017 4:49PM

बुकमार्क करा
बीड :  प्रतिनिधी

माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 30) रोजी रात्री घडली. शहरातील बंजारा नगर भागातील विजय जाधव हे ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात पती पत्नी गेले होते. दोन्ही मुलांना म्‍हणजेच वैष्णव (वय 6), वैभव (वय 3) यांना आजी आजोबांकडे सांभाळ करण्यासाठी ठेवलेले होते.

आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवले होते, याचवेळी थंडी असल्‍याने चुलीजवळ बसलेल्‍या दोन मुलांच्या अंगावर चुलीवरील उकळलेले गरम पाणी पडले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी दवाखण्यात नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्‍यान पुणे येथे शनिवारी रात्री उशिरा या दोन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.