बीड : सिमेंट घेवून जाणारा ट्रक पलटी

Last Updated: May 23 2020 3:30PM
Responsive image


किल्ले धारूर (बीड) : पुढारी वृत्तसेवा 

हैदराबादहून ६०० सिमेंट पोती घेऊन धारूर घाटातून बीडकडे जाणारा ट्रक सकाळी अवघड वळणावर पलटी झाला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. ट्रकमध्ये चालक व क्लिनर होते. ट्रकचा पूर्णपणे चकाचूर झाला. चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. 

शनिवारी (दि.२३) सकाळी धारूर घाटातून बीडकडे ६०० पोती सिमेंट घेऊन जात असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाले. पहाटे चार वाजता समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला वाचवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी डोंगर चढावर चढवली. त्यामुळे समोरून येणाऱ्या स्कार्पियो जीपमधील ६ प्रवाशांचे प्राण वाचले. धारूर घाटात हे नेहमीच अपघात घडतात. येथील रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.