Tue, May 30, 2017 04:06
29°C
  Breaking News  


होमपेज › Marathwada › शेतातील झाडाला आहेराच्या फेट्यानेच गळफास

मुलीच्‍या लग्‍नानंतर पित्‍याची आत्‍महत्‍या 

By pudhari | Publish Date: May 19 2017 3:30PM

नववधुवर दु:खाचे कोसळले आभाळ


नांदगाव :  संतोष कांदे

हातावरची मेहंदी वाळते न वाळते तोच पित्याच्या आत्महत्येने चित्रा या नववधुवर दु:खाचे आभाळच कोसळले. यामुळे दोन्ही परिवारांतील आनंदी वातारण अचानक बदलून दु:खाचे सावट पसरले.

याबाबतची माहिती अशी की, राजेंद्र बाबुराव खेडकर (वय ५० रा. गडशिळ, पारेगाव, जि. बीड) यांची मुलगी चित्रा हिचा विवाह वेहेळगाव येथील काशिनाथ महादु भाबड यांचे चिरंजीव कुशल यांच्या बरोबर बुधवार १७ रोजी वेहेळगाव येथे दुपारी वातावरणात पार पडला. विवाहाचे सर्व सोपस्कर सांयकाळ पर्यंत पार पडल्या नंतर व-हाडी मंडळी वधुचे मामा रत्नाकर शेरेकर यांचेकडे मुक्कामी थांबले होते. सकाळी उठल्यानंतर राजेंद्र खेडकर हे दिसत नसल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. 

एवढ्यात गावातील काही लोकांना गावाजवळील एका शेतातील झाडाला आहेराच्या फेट्यानेच फाशी घेतल्याचे दिसून आले. यानंतर वधुचे मामा शेरेकर यांना बोलवण्यात आले. त्यांनी ते वधुचे पिता राजेंद्र असल्याचे सांगितले. यानंतर त्वरीत नांदगाव पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. 

दरम्यान, राजेंद्र यांचा मुलगा उमेश याने पोलिसांना सांगितले की, वडिलांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा करुन आकस्मित मृत्यूची नोंद क्र.३९/१७  सी. आर. पी. सी. १७४ नुसार नोंद करण्यात आली.