होमपेज › Marathwada › चापट मारली म्हणून तलवारीने हल्ला

चापट मारली म्हणून तलवारीने हल्ला

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 18 2018 11:06PMबीडः प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी घराकडे निघालेल्या दोघा युवकांवर आठ जणांनी किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी परळी शहरतील सिद्धार्थनगर भागात घडली होती.  या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्याने   11 जणांविरुद्ध गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.  

परळी येथील शाम मुंडे आणि अनिल कांबळे हे दोघे बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी घराकडे निघाले होते. यावेळी संदीप ऊर्फ गोट्या रावसाहेब सोनवणे, सुदीप ऊर्फ पापा रावसाहेब सोनवणे, विशाल रावसाहेब सोनवणे, अनिल उत्तम सोनवणे, भय्या उत्तम सोनवणे, महादेव उत्तम सोनवणे, रावसासहेब शंकर सोनवणे आणि भय्या साहेब भानुदास गायकवाड हे आठ जण तिथे आले. त्यांच्याजवळ तलवार, कत्ती, लोखंडी गज, काठ्या आधी शस्त्रास्त्रे होती. तूू भय्याला चापट का मारलीस? असा  प्रश्‍न विचारात त्यांनी अनिल कांबळे, शाम मुंडे, नंदू गायकवाड यांच्यावर तलवार आणि कत्तीच्या साह्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. यात हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत असे अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादीवरून आठ जणांवर संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीप सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, गल्लीत कशाचे भांडण सुरू आहे अशी विचारणा केली असता शाम मुंडे, अनिल कांबळे व नंदू गायकवाड यांनी शिविगाळ करून कत्तीने हातावर व मानेवर वार केले.