Mon, Jun 24, 2019 21:38होमपेज › Marathwada › बीड जिल्हयात शेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

बीड जिल्हयात शेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Dec 15 2017 8:15PM | Last Updated: Dec 15 2017 8:14PM

बुकमार्क करा

गेवराई : प्रतिनिधी

तालुक्यातील कोळगांव येथे एका 50 वर्षीय शेतकरी महिलेने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने लोखंडी अॅगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.15 शुक्रवार रोजी दुपारी तीन च्या दरम्यान उघडकीस आली. 

मिराबाई प्रभाकर नरसाळे (वय 50 वर्ष) रा.कोळगाव ता.गेवराई असे या आत्‍महत्‍या केलेल्‍या महिलेचे नाव आहे. सदरील महिलेने शेतात यावर्षी पडलेल्या बोंडअळीने नुकसान तसेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची माहिती समजताच चकलांबा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करुन सायंकाळी उशिरा या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.