Wed, May 27, 2020 01:11होमपेज › Marathwada › बीड : पिंपळापासून ३ किमी. परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

बीड : पिंपळापासून ३ किमी परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

Last Updated: Apr 08 2020 11:22AM
बीड : पुढारी वृत्तसेवा

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता १९७३, कलम १४४ नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसरामध्ये सुंबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळ सांगवी आणि खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे . 

वाचा - बीडमध्येही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ 

यानंतरचा पुढील चार किलोमीटरचा परिसर लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटेफळ कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे. वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे.

वाचा - बीड : सॅनिटायजर, मास्कचा मोठा साठा जप्त