Wed, Jan 22, 2020 13:11होमपेज › Marathwada › विजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक.

विजयी उमेदवाराच्या मिरवणूकीत दलीत वस्तीवर दगडफेक.

Published On: Dec 27 2017 6:55PM | Last Updated: Dec 27 2017 6:54PM

बुकमार्क करा
आर्वी : प्रतिनिधी

दुपारी बाराच्या सुमारास ग्रामपंचायत निकाल लागल्याने उमेदवार गावात आल्‍यावर विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. यातील काही तरूणांनी मद्यपान करून नशेच्या भरात गावातील दलीत तरूणांना दमदाटी केली व त्यांच्या घरावर दगडफेक केली यात महिला काही तरूण जखमी झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भारती शहाजी भोसले यांच्या विजयाची मिरवणूक काढली होती यातील चार पाच तरूण नशेच्या भरात दलीत वस्तीकडे स्कार्पीयो गाडी घेऊन आले यानंतर तेथील उभे असणाऱ्या तरूणांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. यानंतर तणाव निर्माण होऊन समोरासमोर दगड फेक झाली यात दलीत वस्तीमधील काही महिला जखमी देखील झाल्या असून, उमेदवाराची स्कार्पीयो देखील फोडण्यात आली आहे याघटनेमुळे गावात काही वेळ तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिरूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटना स्थाळावर धाव घेऊन वातावरण आटोक्यात आनले. यानंतर सुमारे शंभर नागरिकांनी गुन्हे नोंद करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आहे.