Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Marathwada › माजी जि.प सदस्य नारायण क्षीरसागर यांचे अपघाती निधन

माजी जि.प सदस्य नारायण क्षीरसागर यांचे अपघाती निधन

Published On: Jan 04 2018 11:34AM | Last Updated: Jan 04 2018 11:34AM

बुकमार्क करा
पाटोदा : प्रतिनिधी

बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पाटोदा येथील रहिवासी  नारायण  मारूती क्षीरसागर (वय, ६५) यांचे अपघाती निधन झाले. बुधवारी मध्यरात्री बीड ते पाटोदा प्रवासा दरम्‍यान जौळाला शंभचिरा येथे क्षीरसागर यांची कार झाडाला धडकली. यात क्षीरसागर यांच्सासह कैलास उत्‍तमराव जाधव (वय, ३२ ) हे ठार झाले. 

भरधाव वेगात असलेल्‍या कारवारील चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.