Sat, Feb 16, 2019 03:36होमपेज › Marathwada › प्रशासनात नाही शिस्त, ट्रॅफिक झाली बेशिस्त

प्रशासनात नाही शिस्त, ट्रॅफिक झाली बेशिस्त

Published On: Feb 12 2018 2:49AM | Last Updated: Feb 12 2018 2:38AMअंबासाखर ः प्रतिनिधी 

 शहरात पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली खड्डा खोदून आठ दिवस झाले आहेत. खड्डा न बुजवल्याने शाळकरी मुले, मुली, तसेच दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असला तरी न. प. प्रशासनास  शिस्त राहिली नसल्याने ट्रॅफि क बेशिस्त झाली आहे.      शहरातील बस स्थानक ते भगवानबाबा चौक दरम्यान रस्त्यावर  काही मोठी वाहने, दुचाकी, अ‍ॅटो  आदी वाहने बेशिस्तपणे भरधाव धावतात. याच रस्त्यावर योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालय आहे. त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची रेचलेल असते. शुक्रवारचा भाजीपाल्याचा बाजार याच रस्त्यावर भरतो.

या मुख्य रस्त्यालगत भगवान बाबा चौक-अण्णा भाऊ साठे चौक- परळीस वेस पर्यंत पन्नास वर्षांपूर्वीची सिमेंटची पाइपलाइन पंधरा फूट खोल आहे. साठे चौकात सिमेंट विक्रीचे अनेक दुकाने आहेत. सिमेेंट वाहतूक करणारी दहा टायरचे ट्रक अनेकदा बेशिस्तपणे या पाइपलाइनवरून जातात. ट्रकच्या वजनाने ही पाइपलाइनवर दबाव आल्यामुळे फुटण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली न. प. प्रशासन करोडो रुपये खर्च करते, मात्र जेवढा निधी आतापर्यंत खर्च झाला तेवढ्या निधीतून नवीन लोखंडी पाइपलाइन आली असती असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

साठे चौक ते योगेश्वरी शाळे दरम्यान आठ दिवसांपूर्वी न. प. पाणी पुरवठा विभागाने पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली मुख्य रस्त्यावर तब्बल पंधरा फूट खोलीचा मोठा खड्डा खोदून ठेवला. या खड्ड्याने  वाहतुकीला अडथळा होत आहे. शिवाय खड्ड्याभोवती सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. खड्ड्याचा अंदाज न आल्यास दुचाकीस्वार अथवा शाळकरी मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या संदर्भात नागरिकांनी पालिकेकडे तक्रार करूनही परिणाम मात्र शून्य झाला आहे.