Thu, Mar 21, 2019 11:19होमपेज › Marathwada › तुमच्या बैलाने आमच्या बैलास का मारले ?; काठ्या-कुर्‍हाडीने महिलेस मारहाण

तुमच्या बैलाने आमच्या बैलास का मारले ?; काठ्या-कुर्‍हाडीने महिलेस मारहाण

Published On: Feb 19 2018 10:55AM | Last Updated: Feb 19 2018 11:06AMबीड : प्रतिनिधी 

तुमच्या बैलाने आमच्या बैलास का मारले,अशी कुरापत काढून सहा ते सात जणांनी काठ्या-कुर्‍हाडीने एका महिलेस मारहाण करण्यात आली. ही घटना माजलगाव तालुक्यातील  वारोळा जोडतांडा येथे घडली.

वारोळा जोडतांडा येथील बायजाबाई देवसिंग राठोड या घरासमोर थांबल्या होत्या. तेथे आलेले बाबू राठोड, लहू राठोड, सीमा राठोड,  मानसिंग  राठोड, रोहिदास राठोड, बाळू राठोड व कमलबाई राठोड यांनी तुमच्या बैलाने आमच्या बैलास का मारले, अशी कुरापत काढत काठ्या कुर्‍हाडीने मारहाण केली. या मारहाणीत  बायजाबाई या जखमी झाल्या. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास फौजदार नरके करीत आहेत.