Fri, Jan 18, 2019 20:08होमपेज › Marathwada › संतापजनक; पीककर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी

संतापजनक; पीककर्जाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी

Published On: Jun 23 2018 10:19AM | Last Updated: Jun 23 2018 10:19AMबुलढाणा: प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुरीसाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणार्‍या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे. 

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.