Thu, Mar 21, 2019 11:28होमपेज › Marathwada › बच्चू कडूंचा दणका; काँग्रेस भाजपाचा दारुण पराभव

बच्चू कडूंचा दणका; काँग्रेस, भाजपचा दारुण पराभव

Published On: Dec 14 2017 3:08PM | Last Updated: Dec 14 2017 3:12PM

बुकमार्क करा

यवतमाळ :प्रतिनिधी

येथील पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजप, काँग्रेसला जोरदार दणका दिला. नगरपालिकेतील एकूण १९ जागांपैकी १४ जागांवर अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

या निवडणुकीत भाजपाला तीन, तर काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी प्रहार संघटनेच्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या. या एकहाती विजयामुळे अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहार संघटनेचा नगराध्यक्ष व पालिकेत सत्ताही आली आहे.