Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Marathwada › कन्यारत्न जन्माचे परभणीत असेही स्वागत

कन्यारत्न जन्माचे परभणीत असेही स्वागत

Published On: Jan 01 2018 12:40PM | Last Updated: Jan 01 2018 12:40PM

बुकमार्क करा
परभणी : प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी  मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या जन्माचे स्वागत मोफत दोन किलो जिलेबी भेट देऊन करण्याचा आगळा वेगळा उपक्रम परभणीतील  एक जिलेबी विक्रेता मागील सात वर्षांपासून राबवत आहे. शहरातील स्टेशन रोडवरील आर. आर. टॉवर परिसरात हरियाणा जिलेबी सेंटर नावाचे दुकान 38 वषार्ंपासून सुरू आहे. हे दुकान धरमवीर श्यामधाम यांचे आहे. त्यांचा मुलगा सनीसिंग याने 7 वर्षांपासून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलगी जन्माला येणार्‍या कुटुंबास मोफत 2 किलो  जिलेबी भेट देण्याचा एक आगळा वेगळा  उपक्रम हाती घेतला आहे.

प्रथम वर्षी 11 मुलींच्या जन्माचे स्वागत झाले. 2012 साली 12 मुली तर 2013 साली 21 मुलींच्या जन्माबद्दल जिलेबी भेट दिली. या उपक्रमाची माहिती लोकापर्यंत पोहोचावी वमुलीचे महत्व प्रत्येकाला समजावे, यासाठी  सनीसिंग यांच्याकडून शहरातील सामान्य रुग्णालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी  ठिकाणी मोफत जिलेबी वाटप उपक्रमाचे पॉम्पलेट लावण्यात येते.

यासाठी शहरात ज्या दवाखान्यात मुलगी जन्मास येईल त्या डॉक्टराकडून  मुलीच्या जन्माचे  प्रमाणपत्र आणणार्‍या व्यक्‍तीस ही जिलेबी वाटप करण्यात येते. नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने अनेकजण साजरे करतात, मात्र यात होणारी पैशांची  धळपट्टीथांबवून स्त्री जन्माच्या स्वागताचा एक आगळावेगळा उपक्रम या हरियाणा जिलेबी सेंटरमालकाकडून राबविला जात आहे. 

कुमार हॅन्डलूमचा पुढाकार 

शासनाच्या बेटी बचाओ या धोरणास कुमार हॅन्डलूम हाऊसच्या वतीने एक प्रसिध्दी व स्त्री जन्म देणार्‍या दाम्पत्यांना प्रोत्साहन म्हणून बाळास मच्छरदानी, बेबी ब्लँकेट व बेबी रेक्झीम देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हॅन्डलूमचे मालक भगवानदास खैराजानी यांच्यावतीने याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी जन्मलेल्या कन्यारत्नास एक भेटवस्तू देऊन अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या दाम्पत्यास नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्यारत्न प्राप्‍त झाले अशांनी स्टेशन  रोडवरील कुमार हॅन्डलूम येथे येऊन संपर्क  साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वर्षात 1 जानेवारी रोजी  सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंतयावेळेत जन्म दिलेल्या  मातांना ही  जिलेबी देण्यात येणार आहे. त्यासाठी  बालिकेचे जन्म प्रमाणपत्र किंवा डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणावे लागणार आहे.

मुलींच्या जन्मदराचे घटते प्रमाण ही एक  सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शासनस्तरावर व सामाजिक संस्थेच्या वतीने बेटी  बचाओ अभियान राबवून स्त्रीभू्रण हत्या रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या  उपक्रमात आपलाही  खारीचा वाटा असावा या हेतूने उपक्रम सुरू केला आहे असे जिलेबी विक्रेता सनीसिंग यांनी सांगितले.