Thu, Aug 22, 2019 04:34होमपेज › Marathwada › विधान परिषद निवडणुकीसाठी दुर्राणी यांचा अर्ज

विधान परिषद निवडणुकीसाठी दुर्राणी यांचा अर्ज

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 10:36PMपाथरी : प्रतिनिधी

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे निवडून द्यावयाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  परभणीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दि.5 जुलै  रोजी नागपूर येथील विधान भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  

यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते आ. छगनराव भुजबळ  यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी दिलीप वळसे पाटील, आ. सुनील तटकरे, आ.भास्करराव जाधव, आ. विजय भांबळे, आ.डॉ. मधुसूदन केंद्रे, विद्याताई चव्हाण, आ. विक्रम काळे, आ.हेमंत टकले, आ.प्रदीप नाईक, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडून द्यावयाच्या 11 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून निवडून द्यावयाची एक जागा असून त्या जागेवर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत  त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांच्याकडे दाखल केला.