Tue, Jul 16, 2019 22:34होमपेज › Marathwada › लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी; धनंजय मुंडेंना झटका!

लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी; धनंजय मुंडेंना झटका!

Published On: Jun 12 2018 9:24AM | Last Updated: Jun 12 2018 10:24AMबीड : प्रतिनिधी

लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या जागेसाठीची झालेल्‍या निवडणुकीत भाजपचे सुरशे धस ७८ मतांनी विजयी झाले आहेत. धस यांनी राष्ट्रवादी पुरस्‍कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता. 

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी तात्काळ घेऊन, निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले होते . लातूर -उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या १० सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते . राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले होते. 

Tags : aurangabad, beed, constitution vidhanparishad election, result