Sat, Feb 16, 2019 09:15होमपेज › Marathwada › लातूरच्या माजी महापौरावर प्राणघातक हल्ला

लातूरच्या माजी महापौरावर प्राणघातक हल्ला

Published On: Dec 26 2017 7:10PM | Last Updated: Dec 26 2017 7:10PM

बुकमार्क करा

लातूर : पुढारी ऑनलाईन

दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत लातूरचे माजी महापौर अख्तर मिस्त्री यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील मिस्कीमपूरा भागात सोमवारी रात्री ही घटना घडली.  याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरुन एकमेकाविरोधात गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत. 

मुलाने मोटारसायकलची कट मारली म्हणून काझी व मिस्त्री यांच्या परिवारात वाद झाला होता. सोमवारी रात्री काझी यांच्या गटाचे १५ ते २० जण मिस्त्री यांच्या घरासमोर आले व त्यांनी अख्तर मिस्त्री यांचा मुलगा व भावावार हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी अख्तर गेले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यांमुळे त्यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली. यात मिस्त्रीसह अन्य दोन व हल्ला करणाऱ्या गटातील तीन असे एकूण सहाजण जखमी झाले आहेत. अफसर मिस्त्री यांच्या फिर्यादीवरुन बाबा काझी व इतरांविरोधात तर जुबेरअली सय्यद यांच्या फिर्यादीवरुन अफसर मिस्त्री व अख्तर मिस्त्री यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.