होमपेज › Marathwada › एटीएमचा डाटा चोरून रक्‍कम लंपास करणारे गजाआड

एटीएमचा डाटा चोरून रक्‍कम लंपास करणारे गजाआड

Published On: Feb 15 2018 1:47PM | Last Updated: Feb 15 2018 1:47PMनंदुरबार : प्रतिनिधी

एटीएमचा डाटा चोरून रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नंदुरबार गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. जळगाव, धुळे या शहराबरोबरच मुंबई, बोरिवली येथीलही गुन्हे ऊघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एटीएममध्ये उभा राहून कोणाचाही पासवर्ड माहित करून घेणे मग त्या आधारे पैसे काढून घेणे किंवा त्या खातेधारकाचा डाटा उतरवून बनावट कार्डद्वारे पैसे चोरणे अशी पध्दत या चोरट्यांनी अवलंबली होती. संशयावरून ताब्यात घेतलेल्या तिघांनी माहिती दिल्यानंतर हे उघड झाले.

सय्यद खान कमालोद्दिन खान (वय २७), तौफिक खान सनाफ मुस्तकीन खान (२५), ओमप्रकाश मनिरीम जयस्वाल (२१) अशी या तीन संशयितांची नावे असून उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या तिघांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.